Dimple Creation Nashik

Dimpleplasty, Dimple creation nashik

आपला चेहरा सुंदरच नाही तर आकर्षक दिसावा असे प्रत्येकाला वाटते. आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्नही करत असतो. यामध्ये विविध प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरणे , आभूषणे वापरणे यांचा समावेश होतो. गालावर असणारी खळी म्हणा किंवा एखादा ओठांवर असणारा “ब्युटी स्पॉट” म्हणा , हे एखाद्या चेहऱ्याचे सौंदर्य अजून खुलविते . या कारणामुळे ज्यांना अशी खळी  नाही ती मंडळी ( यामध्ये स्त्रियांइतकेच पुरुषही इच्छूक असतात !) अशी नैसर्गिक दिसणारी खळी बनविण्यासाठी प्लास्टिक सर्जन्सकडे येतात.

आपण आधी जाणून घेऊ या कशामुळे हिखळीदिसते?

आपल्या चेहऱ्यावरील भाव दर्शविणारे साधारणतः २० स्नायू आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखाली असतात. यापैकी आपल्या हसण्याशी संबंधित असणारा स्नायू ( Zygomaticus Major) हा ओठांच्या कॉर्नर्सला वरती खेचतो. ह्या स्नायूंची त्वचेबरोबरची बांधणी काही व्यक्तींमध्ये वेगळी असते ज्यामुळे हसल्यावर गालावरची त्वचा स्नायूबरोबर खेचली जाते. ह्यालाच डिम्पल अर्थात “खळी” असं म्हटलं जातं.  हि “खळी” काहींमध्ये एका बाजूला आढळते आणि इतरांमध्ये दोघे बाजूला . तसेच काहींमध्ये ती उथळ असते तर इतरांमध्ये खोलगट. बोलताना आणि खासकरून हसतांना खळी चेहऱ्याला अधिकच आकर्षक बनविते. हि झाली नैसर्गिक रित्या असणारी खळी .

परंतु, आता एक छोटीशी सर्जरी करूनही आपल्याला नैसर्गिक दिसणारी खळी चेहऱ्यावर एका अथवा दोघे गालांवर, तेपण कुठलाही व्रण त्वचेवर न दिसता  बनविणे सहज शक्य आहे. ह्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज नाही.

आपणास हव्या असलेल्या ठिकाणावर किंवा काही  विशिष्ठ संरचनांच्या  मदतीने खळी  तयार  करण्याची जागा ठरविली जाते. त्या जागेवर एक बारीक अश्या सुईने तोंडाच्या आतमधून भूल देऊन मग हि शस्त्रक्रिया केली जाते. या सुईच्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाची वेदना आपणास होत नाही.

ऑपरेशन केल्यानंतर अंदाजे ३ ते ४ महिने हि खळी नेहमीच ( स्टॅटिक ) दिसते, परंतु त्यानंतर ती फक्त बोलताना किंवा हसतानाच ( डायनॅमिक ) दिसू लागते.

आता अश्या प्रकारच्या प्रोसिजर्स अगदी कमी खर्चात करणे शक्य आहे. आवश्यकता भासल्यास सुलभ हप्त्यात बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अधिक माहितीसाठी :

येथे क्लिक करा

डॉ किरण नेरकर

प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन