आपले शरीर दैनंदिन आहाराद्वारे जी “शुगर” ग्रहण करते , त्याचा “इन्शुलिन ” नामक संप्रेरकाद्वारे शरीरात उपयोग केला जातो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये इन्शुलिन चे पर्याप्त मात्रेमध्ये उत्पादन होत नाही. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते , त्याला आपण मधुमेह असे म्हणतो. जागतिक पातळीवर सुमारे ४१५ दशलक्ष लोकांना (म्हणजेच ११ मधील १ व्यक्तीला) मधुमेह आहे. मधुमेह असलेले अंदाजे ६९ दशलक्ष लोक भारतात आहेत. (या बाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत )
डायबिटीस चा पायांशी काय संबंध आहे?
डायबिटीस मुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि मग पायाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही , तळपायाला संवेदना जाणवत नाहीत , पाय सारखे कोरडे पडतात, रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे पायाच्या सांध्यांची जडणघडण बिघडते आणि मग चालतांना विशिष्ठ भागांवर जास्त दाब येऊन तिथे कॉर्न अथवा जखमा होतात. या सर्व कारणांमुळे पायाला झालेली इजा रुग्णाला लवकर समजत नाही, आणि त्याचबरोबर रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे जंतुसंसर्ग होतो. अश्या जखमांकडे दुर्लक्ष झाल्यास बऱ्याच वेळा पायाच्या बोटाचे किंवा पायाचे अंगच्छेदन (Amputation) करायची वेळ येते. मधुमेह असलेल्यांपैकी १५ % लोकांना त्यांच्या जीवनकाळात एकदा तरी पायाला जखम होते, आणि एक क्लिष्ट पायाची जखम हि मधुमेह असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या कारणांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांप्रमाणे , आपण मधुमेहामुळे दर ३० सेकंदाला १ पाय गमावत आहोत. पाय गमावण्याचे प्रमाण (Amputation) हे मधुमेह झालेल्या रुग्णांमध्ये सामान्य माणसांपेक्षा २२ पट जास्त आहे . आणि अश्या रुग्णांमधिल ८५% रुग्णांना आधी पायाला न सावळणारी जखम झालेली असते. या जखमांवर वेळीच उपचार केले गेले किंवा पायांची प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर पायाचे अंगछेदन (amputation) टाळता येवू शकते. वेळीच फूट सर्जनचा सल्ला घेतल्यास ह्या भयावह गोष्टी टाळल्या जाऊ शकतात.
अशी घ्याल पायाची प्रतिबंधात्मक काळजी (Preventive Foot Care):
१. रोज आपल्या पायांची तपासणी करा / करून घ्या: पायाला कुठल्याही प्रकारचं खरचटले, जखम, फोड, लाली अथवा सूज नाही याचा शहानिशा करून घ्या. आवश्यक असल्यास त्यासाठी भिंग वापरा. तळपाय तपासण्यासाठी आरसा वापरल्यास उत्तम. शंकास्पद गोष्ट आढळल्यास त्वरित प्लास्टिक सर्जनना दाखवा.
२. पाय रोज कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, पुसतांना बोटांमधील जागा व्यवस्थित रित्या कोरडी करून घ्या. पायाला क्रीम लावतांना बोटांमधील जागेवर ते लावणे टाळा.
३. आपली नखे काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढेच कमी करा; अधिक खोलवर नखे कापल्यास सभोवतालच्या त्वचेमध्ये त्यांची वाढ होते ( Ingrown Toe Nail) आणि मग त्यात जंतुसंसर्ग होऊ शकतो.
४. स्वच्छ आणि योग्य मापाचे मोजे वापरा.
५. घरात किंवा घराबाहेर अनवाणी चालणे टाळा. योग्य मापाचे बूट वापरा, आपले बूट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामधील दगड, कचरा इ. नियमितरित्या साफ करा.
६. रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवा: त्यासाठी आहारतज्ञांचा नियमित सल्ला, आपल्या फिजिशियन चा सल्ला आणि त्यांनी सुचविल्यानुसार व्यायाम व औषधे हे काटेकोरपणे पाळा .
७.आपल्या प्लास्टिक सर्जनचा नियमित सल्ला घ्या.
ह्या प्रतिबंधात्मक गोष्टी पाळल्यास Amputation टळू शकते आणि आपण सामान्य जीवनाचा आनंद उपभोगू शकता.
कुठल्याही प्रकारची जखम झाल्यास सेल्फ मेडिकेशन्स टाळा. त्यासाठी प्लास्टिक सर्जनची भेट घ्या. जर पायाला खाली व्यवस्थित रक्तपुरवठा होत नसेल तर Peripheral Vascular Bypass च्या साहाय्याने तो सुरळीत केला जाऊ शकतो. काही जखमा ह्या ऑपरेशन न करता फक्त फुटवेअर मॉडिफिकेशन करूनही बऱ्या केल्या जाऊ शकतात. Wound Care मधेही प्लास्टिक सर्जन पारंगत असतात. सगळ्या प्रकारच्या जखमांची शुश्रूषा करून त्या व्यवस्थित रित्या बंद करून रुग्णास पूर्ववत पाय देण्याची किमया प्लास्टिक सर्जनच करू शकतात.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींमध्ये हातांमध्ये हि काही प्रमाणात व्याधी आढळतात. पायाप्रमाणेच हातांच्या सुद्धा मांसपेशी आणि सांध्यांमधली जडणघडण बिघडते . हाताची बोटे पूर्णपणे सरळ न झाल्यामुळे हातांची कार्यक्षमता कमी होते (लिमिटेड जॉईंट मोबिलिटी). टाईप १ डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आढळते.
हाताच्या शिरा कठीण होऊन बोटं आखडणे (Dupuytrens Contracture) , हाताच्या नसांवर दाब येऊन बोटांमध्ये स्पर्शज्ञान कमी होणे / हातांना मुंग्या येणे ( Carpal Tunnel Syndrome ), बोटे पूर्णपणे सरळ करताना त्रास होऊन “खट” असा आवाज जाणवणे (Trigger Finger), हाताला कमकुवत पणा (Weakness) येणे, बोटांच्या त्वचेमध्ये / नखांमध्ये जंतुसंसर्ग होणे